YOJANADOOT BHARTI 2024 :-
नमस्कार मित्रांनो तुम्ही जर सुशिक्षित बेरोजगार असाल आणि तुम्ही का चांगल्या आणि सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर ही तुमच्यासाठी खूप महत्त्वाची ठरणार आहे महाराष्ट्र शासनाच्या अनेक योजना विषयी तसेच नवनवीन निघणाऱ्या नोकरी भरती विषयी माहिती आम्ही तुम्हाला वेळोवेळी देत असतो. हाच अशाच एका सरकारी नोकरीची सविस्तर माहिती तुम्हाला मिळणार आहे तरी हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा.
या कार्यक्रमाचे नाव आहे मुख्यमंत्री योजना दूत भरती या कार्यक्रमांतर्गत विविध पदांची जवळजवळ पन्नास हजार पदे भरण्यात येणार असून या पदांसाठी ठोक दहा हजार रुपयांचा पगार देण्यात येणार आहे तरी सुशिक्षित बेरोजगारांना ही एक सुवर्णसंधी महाराष्ट्र शासनाने उपलब्ध करून दिले आहे तरी सुशिक्षित तरुणांनी याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा.
महाराष्ट्र राज्यात या योजनेचा जास्तीत जास्त तरुणांना लाभ होण्यासाठी महाराष्ट्र शासनाने आज मुख्यमंत्री योजना दूत भरती या नावाने जीआर काढला आहे. महाराष्ट्र शासनाच्या नवीन नवीन योजना तसेच चालू असणारे योजनांची जास्तीत जास्त माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी या पदांची भरती करण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत ज्या उमेदवाराची निवड होईल त्या उमेदवारांनी सरकारच्या नवनवीन योजनांची माहिती नागरिकांपर्यंत सविस्तरपणे पोहोचवणे हे त्याचे मुख्य कार्य असेल. या नोकर भरतीचा मुख्य उद्देश हाच राहील की शासनाच्या योजनांची सविस्तर माहिती सामान्य नागरिकांपर्यंत पोहचावी. शासनाच्या योजनांची बऱ्याच नागरिकांना माहिती मिळत नाही त्यामुळे लोक या योजनांपासून वंचित राहतात त्यामुळे ही अडचणी लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री योजना दूत भरती जाहीर केली आहे.
YOJANADOOT BHARTI 2024
मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्यामार्फत ही भरती राबवण्यात येणार असून राज्यातील प्रशासकीय यंत्रणेला याचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे या यंत्रेला हे योजना दूत खूप उपयुक्त पडतील. या यंत्रणेला मदत करण्याकरिता मुख्यमंत्री योजना दूध यांची निवड करण्यात येणार आहे महाराष्ट्रातून जवळजवळ 50 हजार पदे भरून काढण्यात येणार असून त्यांना ठोक दहा हजार रुपयांचा पगार जाहीर करण्यात आला आहे.
या योजनांची संख्या 50000 असून ग्रामीण भागातील प्रत्येक ग्रामपंचायतीला एक योजना दिली नेमण्यात येणार आहे या योजना दुतामुळे शासनाच्या नवनवीन योजनांची माहिती त्वरित नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत होईल. तर शहरी भागासाठी प्रत्येकी 5000 लोकसंख्या असणाऱ्या भागात एक योजना नेमण्यात येणार आहे. या योजना दूताचे मुख्य कार्य हेच राहील की शासनाने काढलेले जीआर तसेच घोषित केलेल्या योजना त्वरित व सविस्तरपणे सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्यात याव्या.
YOJANADOOT BHARTI 2024
मुख्यमंत्री योजना दूत निवडीसाठी काही अटींची पूर्तता करावी लागणार आहे त्या अटी पुढील प्रमाणे:-
या योजनेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची वय 18 ते 35 या दरम्यान असणे आवश्यक आहे 35 वर्षावरील उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार नाही याची दखल घेऊन उमेदवारांनी आपला अर्ज दाखल करावयाचा आहे. या योजनेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे स्वतःचा मोबाईल असणे अत्यावश्यक राहील ज्या उमेदवारांकडे स्वतःचा मोबाईल राहील अशा उमेदवारांना अधिक प्राधान्य देऊन त्यांची निवड करण्यात येईल.
तसेच सर्वात महत्त्वाचे म्हणजे उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे त्यासाठी उमेदवाराकडे त्याचा रहिवासी दाखला असणे गरजेचे आहे. अर्ज करणारा उमेदवार महाराष्ट्राचा रहिवासी नसल्यास त्याला या भरतीसाठी अर्ज करता येणार नाही त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी योग्य माहिती वाचून आपला अर्ज दाखल करावा अर्धवट माहिती वाचून अर्ज दाखल केल्यास तो अर्ज बाद करण्यात येईल.
YOJANADOOT BHARTI 2024
तसेच उमेदवाराकडे स्वतःचे आधार कार्ड असणे आवश्यक राहील तसेच ते आधार कार्ड त्याच्या बँक खात्याशी लिंक असणे तितकेच महत्त्वाचे आहे आधार कार्ड लिंक नसल्यास तो अर्ज बाद करण्यात येईल.
या भरतीसाठी अर्ज करण्याकरता काही कागदपत्रांची आवश्यकता लागणार आहे ती पुढील प्रमाणे सविस्तर पाहूया.
मुख्यमंत्री योजना दूत या भरतीसाठी अर्ज करण्याकरिता ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरावा लागणार आहे तसेच सोबत आधार कार्ड अपलोड करावे लागणार आहे तसेच उमेदवार पदवी उत्तीर्ण असल्यास पदवीचे प्रमाणपत्र मग ती पदवी कोणत्याही शाखेतील असेल. तसेच उमेदवाराचा अधिवासाचा दाखला यासोबत जोडणे अत्यावश्यक राहील हा दाखला न जोडल्यास तुमचा अर्ज बाद करण्यात येईल.
YOJANADOOT BHARTI 2024
तसेच उमेदवाराने अर्ज करताना त्याच्या वैयक्तिक बँक खात्याचा म्हणजेच त्याचे ज्या कोणत्याही बँकेत खाते आहे त्या बँक खात्याचा तपशील सविस्तर देणे आवश्यक राहील. त्यामुळे उमेदवाराचे कोणत्याही बँकेत खाते असणे आवश्यक असणार आहे तरच या पदासाठी त्या उमेदवाराला अर्ज करता येणार आहे जर तुमचे बँकेत खाते नसेल तर तुम्हाला या पदासाठी अर्ज करता येणार नाही याची दखल घेऊनच उमेदवारांनी आपला अर्ज दाखल करायचा आहे.
शासनाचा GR | file:///C:/Users/TEJAS-PC/Downloads/202408071832084807…pdf |
तसेच उमेदवार आला अर्ज दाखल करताना दोन पासपोर्ट साईज फोटोंची आवश्यकता लागणार आहे त्यामुळे अर्ज करताना उमेदवाराने दोन पासपोर्ट फोटो देणे आवश्यक आहे. त्यानंतर या कागदपत्रांमध्ये शेवटचे कागदपत्र म्हणजे ऑनलाईन अर्ज सोबत असलेले हमीपत्र हे हमीपत्र जोडणे अत्यावश्यक राहील त्याशिवाय हा अर्ज पुढे पाठवण्यात येणार नाही आम्ही पत्र न जोडल्यास तुमचा अर्ज बाद करण्यात येईल त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी हमीपत्र जोडणे आवश्यक राहील.
आता आपण हा योजना दूत निवड झाल्यानंतर याची नेमकी कामे काय असणार आहेत तसेच हा योजना दूत कशा पद्धतीने काम करणार आहे याची सविस्तर माहिती जाणून घेऊ.
YOJANADOOT BHARTI 2024
निवड झालेला योजना दूत हा संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या हाताखाली काम करेल जिल्हाधिकाऱ्यांच्या संपर्कात राहून जिल्ह्यातील अनेक योजनांची माहिती जिल्हाधिकारी मार्फत या योजना दुकान पर्यंत पोचवण्यात येईल त्यानंतर त्यांनी ती माहिती योग्यरीत्या समजून घेऊन ती माहिती सविस्तरपणे सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवणे हाच मुख्य उद्देश ठेवून मुख्यमंत्री योजना दूत या पदाची निवड करण्यात आली आहे त्यामुळे या भरतीचा मुख्य उद्देश हाच राहील की शासनाच्या नवनवीन योजनांची माहिती सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवणारा एक माणूस म्हणजेच योजना दूत.
निवड झालेल्या उमेदवाराने त्याला मिळालेल्या माहितीची योग्यरीत्या आकलन करून त्या योजनांचा प्रचार ग्राम पातळीवर जाऊन घरोघरी नागरिकांना सविस्तर माहिती पुरवण्याचे काम करावे लागणार आहे. त्यामुळे उमेदवाराला संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक राहील व ज्या उमेदवाराला संघर्षाचे चांगल्या पद्धतीने ज्ञान असेल अशा उमेदवारांची निवड होण्याची शक्यता जास्त असेल ही दक्षता घेऊन उमेदवारांनी आपला अर्ज सादर करायचा आहे.
आता मुख्य प्रश्न येतो की या निवड झालेल्या उमेदवाराला नक्की वेतन किती मिळेल तर या उमेदवारांना पक्के दहा हजार रुपये इतके वेतन देण्यात येणार आहे त्यामुळे गावात राहून काम करण्यासाठी बेरोजगार तरुणांना ही एक चांगली संधी शासनातर्फे चालून आले आहे तरी या संधीचा जास्तीत जास्त तरुणांनी लाभ घ्यावा हीच विनंती.
YOJANADOOT BHARTI 2024
वरील माहिती उपयुक्त वाटल्यास हा लेख जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद !